डोंबिवलीकर कल्चर क्लब
डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराचे पुढचे पाऊल संपादक ना. रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीतील सर्व कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून ‘डोंबिवलीकर कल्चर क्लब’ ची स्थापना करण्यात आली. आज मिराज सिनेमा, डोंबिवली येथे डोंबिवलीतील सर्व क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्या शुभहस्ते डोंबिवलीकर कल्चर क्लबचे अनावरण झाले. वीर सावरकर रोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात या क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच डोंबिवलीकर कल्चर क्लबच्या सभासदांना डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांना उपस्थित राहता येणार आहे. डोंबिवलीकर कल्चर क्लबच्या माध्यमातून विविध मान्यवरांच्या मुलाखती, पुस्तक प्रकाशन, विविध मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि विवध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. सर्व संस्थातील मान्यवरांनी या डोंबिवलीकर कल्चर क्लबचे सभासद व्हावे असे आवाहन संपादक नामदार रविंद्र चव्हाण यांनी याप्रसंगी केले. ज्यांना या क्लबचे सभासद व्हायचे असेल त्यांनी डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या कार्यालयाशी संपर्क साधावा ही नम्र विनंती.
संपर्क :
प्रभू कापसे,९८२०८५९७८३
कार्यकारी संपादक
डोंबिवलीकर- एक सांस्कृतिक परिवार
ना. संपादक रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीकर कल्चर क्लबचे पहिले पुष्प…
श्री माधव जोशी लिखित टाटा एक विश्वास या पुस्तकाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी श्रीयुत माधव जोशी यांची मुलाखत नक्की पहा…
डोंबिवलीकर कल्चर क्लब सभासद नोंदणी फॉर्म